Search This Blog

Wednesday, 25 April 2018

ज्येष्ठ अभिनेत्री अमिता उद्‌गाता यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री अमिता उद्‌गाता यांचे मंगळवारी (ता. 24) रात्री निधन झाले. त्यांची फुप्फुसे निकामी झाली होती. चार दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर गुरुवारी (ता. 26) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत."मन की आवाज प्रतिग्या' या मालिकेतील अम्मा ही त्यांची भूमिका गाजली होती, तसेच 1979 ते 1990 या काळात त्यांनी दिल्ली दूरदर्शनवरही काम केले होते. त्यांनी "कुछ रंग प्यार के ऐसे भी', "महाराणा प्रताप', "बाबा ऐसो वर ढुंढो', "डोली अरमानों की', "रूई का बोझ' या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. "सरबजीत', "हसी तो फसीं', "अमू' या चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या.


अधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी