Search This Blog

Sunday, 1 April 2018

मोबाईल - स्पर्धा परिक्षकांसाठी एक शाप

मोबाईल आता चैनीची वस्तू ना राहता आता एक गरज बनली आहे. प्रत्येकाला आपल्याकडे मोबाईल असावे ते अधिकाधिक advance असावे असे वाटते. यात वावग काही नाही, परंतु आती तिथे माती ही म्हण आजज्या स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना लागू होताना दिसते. ( अर्थातच सर्वानाच हे सारखे लागू होत नाही)

आजची आपली पिढी ही Don't Miss The Train Syndrome  या आजाराने ग्रस्त झली आहे. अनेक विद्यार्थी आपल्याकडून काही सुटणार नाही या काळजीत दिवस दिवस व्हाट्सए टेलिग्राम इत्यादी अँप्सवर दिवस वाया घालवतात. मी असे अनेक व्हाट्सअप्प ग्रुप पाहिले आहेत की जावर काही मुलं एखादा प्रश्न टाकतात आणि बाकीचे लोक दिवसभर त्यावर चर्चा करत असतात. काही ग्रुप्सवर  मूल मेसेज टाकतात ही pdf पाठवा तो पेपर पाठवा. दुसऱ्याला disturb करण्यापेक्षा स्वतः google वर शोधा.

चालू घडामोडी या भागावर विद्यार्थ्यांचा बराच भर असतो. परिक्षेचा विचार केल्यास ते योग्य आहे पण आपण ज्याप्रमाणात त्यासाठी वेळ देतो त्या प्रमाणात ते महत्वाचा आहे का ते बघणेही तितकेच महत्वाचे आहे. प्रश्न पत्रिकांचे नीट विश्लेषण केल्यास आपल्याला लक्षात येईल की कोणत्याही परीक्षेत चालू घडामोडी या भागावर जास्तीत जास्त 10 ते 15 प्रश्न येतात. मग त्यासाठी दिवसभर टेलिग्राम चॅनेल्स बघत राहणे किंवा व्हाट्सअप्पवर  वेळ घालवणे कितपत योग्य आहे हा विचार करणं खुपच  महत्वाचं आहे. आपल्याला इतर विषय ही तितकेच महत्वाचे आहेत.
चालू घडामोडीचा अभ्यास करण महत्वाचं आहेच कारण परिक्षेत प्रश्न येणार असतील तर अभ्यास करावाच लागणार, परंतु अभ्यासाची पद्धत सुद्धा महत्वाची आहे. अनेक विद्यार्थी मॅगझीनला पैसे लागतील किंवा पेपर घेण्यासाठी महिन्याकाठी 150 ते  200 रुपये जातील या विचाराने मोबाईलवरच अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. परंतु 200 ते 300 वाचवण्याचा प्रयत्नात आम्ही आमचा अमूल्य वेळ वाया घालतोय हे मात्र त्यांना कळतच नाही.

अनेक लोक म्हणतील की स्वतःवर नियंत्रण असलं की मोबाईलचा दुरुपयोग होणार नाही. परंतु हे लक्ष्यात घ्यायला हवे की स्वतःवर नियंत्रण असायला आपल्यातील प्रत्येक जन काही भगवान महावीर ( आज महावीर जयंती) किंवा गौतम बुद्ध नाही. काही लोक ते करू शकतात पण प्रत्येकाला ते जमेलच अस होत नाही.  त्यातच विद्यार्थी दशेतील हे वयच अस असत की कळतंय पण वळत नाही. मोबाईलवर आपला वेळ वाया जातो हे कळत पण मोबाईल शिवाय करमत नाही अशी आपली अवस्था असते. मोबाईल सगळ्यांसाठीच शाप आहे असे माझं मत नक्कीच नाही, पण अनेकांना आपला यात वेळ खूप जातोय हे कळण्या अगोदरच वेळ निघून गेलेली असते.

हे तर झालं समस्येविषयी पण मग आता यावर उपाय सुद्धा आवश्यक आहे. अनेक लोकांना मोबाइल शिवाय करमत नाही. (मीही त्याच्यातीलच एक आहे) यावर सोपा उपाय म्हणजे आपल्याकडे दोन फोन ठेवावेत. एक स्मार्ट फोन आणि दुसरा अतिशय साधा फोन ज्यामध्ये फक्त फोन करणे आणि sms इतकीच सुविधा असेल. स्मार्ट फोन दिवसभर घरीच ठेवायचा आणि साधा फोन आपल्या सोबत अभ्यासिकेत. म्हणजे आपण दिवसभर स्मार्ट फोनवर वेळ वाया घालवणार नाही. अभ्यासिकेतून घरी गेल्यावर निवांतपणे दोन तास जरी मोबाईलवर टाइमपास केला तरी हरकत नाही, निदान दिवसभर तरी अभ्यासावर आपलं लक्ष केंद्रित करता येईल. यातून आपल्या ध्येयापर्यंत लवकर पोहचणे तुम्हाला शक्य होईल असा माझा विश्वास आहे.

करके देखीये अच्छा लागता है।।

All The Best
By-  गौरव कोटेचा
RK IAS Academy Pune

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी