Search This Blog

Thursday, 22 March 2018

वेदर रेडी नेशन

हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या देशात भारत सहावा

अमेरिकेच्या तुलनेत भारताला हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसत आहे. या बदलामुळे सर्वाधिक धोका असणाऱ्या देशांमध्ये भारत सहाव्या क्रमांकावर आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी मदत करणाऱ्या ‘वेदर रेडी नेशन’ कार्यक्रमाची अंमलबजावणी भारतात होणार का? असा प्रश्न हवामान तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

अमेरिकेत हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी तेथील हवामान खात्याकडून ‘वेदर रेडी नेशन’ कार्यक्रम राबवला जातो. याअंतर्गत स्थानिक नागरिकांना आणि प्रसारमाध्यमांना देखील हवामान बदल ओळखण्यापासून तर हवामानाचे धोके आणि बचावाचे पर्याय याविषयी प्रशिक्षित केले जाते. हवामान खात्याने तयार केलेले स्वयंसेवक शाळांमध्ये प्रशिक्षण देतात. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. भारतात गेल्या काही वर्षांत हवामान बदलाच्या दुष्परिणामांची तीव्रता वाढत आहे. जागतिक हवामान संस्थेने यावर्षी ‘वेदर रेडी क्लायमॅट स्मार्ट’ अशी हवामान दिवसाची संकल्पना निश्चित केली. वादळी पाऊस, चक्रीवादळाच्या संकटाला तोंड देण्यासाठी समाजाला तयार करणे, त्यावर पर्याय शोधणे, हा यामागील हेतू आहे. त्यामुळे ती राबवण्यासाठी भारताची तयारी आहे का, हे येत्या काळातच कळणार आहे.

[Source : Loksatta | March 23, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी