Search This Blog

Wednesday, 28 March 2018

महिलांसाठी तेजस्विनी बस सुरू

शहरी भागामध्ये नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या महिलांची वाढती संख्या आणि अपुऱ्या बसेसच्या फेऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून आता सुटका होणार आहे. यासाठी पीएमपीएलने खास महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू केली. त्यामुळे महिलांनी आनंद व्यक्त केला. गाडीतळ ते वारजे या मार्गावर रोज चार तेजस्विनी बस धावणार आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. या बसमधून २२ महिला प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने या बसमध्ये सीसी टिव्ही कॅमेरे, जीपीआरएस, अल्हाददायक सिटची रचना या बसमध्ये उपल्बध आहेत. या बसेससाठी महिला कंडक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना या सेवेमुळे सुरिक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे. [Source: Sakal | March 29, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी