Search This Blog

Monday, 26 March 2018

राज्यातील पहिले सोलर पार्क धुळ्यात


राज्यातील तूट भरून काढण्यासाठी दोंडाईचा-विखरण परिसरात सौरऊर्जेवर आधारित 500 मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. पैकी पहिल्या टप्प्यात 250 मेगावॉट सौर वीजनिर्मिती प्रकल्पाला म्हणजेच सोलर पार्कला सरकारने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने "महाजनको'ने नियोजन सुरू केले आहे. यात जे शेतकरी किंवा इतरांना जमिनी द्यायच्या नाहीत, त्यांना वगळून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे "महाजनको' स्तरावर विचाराधीन आहे.

"औष्णिक'ऐवजी आता सोलर पार्क
दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीतून शिवाजीनगर (ता. साक्री) येथे सुरू झालेल्या दीडशे मेगावॉटच्या सोलर सिटी प्रकल्पानंतर दोंडाईचा-विखरण परिसरात दुसरा आणि वाढीव क्षमतेचा सोलर पार्क प्रकल्प प्रस्तावित आहे. यात 138 शेतकरी आणि सरकारमधील भूसंपादनाच्या मोबदल्याप्रश्‍नी वाटाघाटी फिसकटल्याने या क्षेत्रात 2009 पासून प्रस्तावित 3300 मेगावॉट औष्णिक वीजनिर्मितीचा प्रकल्प गेल्या वर्षी रद्द झाला. त्याऐवजी सुमारे साडेतीन हजार कोटींच्या गुंतवणुकीतील सोलर पार्क प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला. पैकी पहिल्या टप्प्यात अडीचशे मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पाला मान्यता दिली आहे. त्याची महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी (महाजनको) अंमलबजावणी करेल.
[Source: Sakal | March 27, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी