
काठमांडूमध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP)च्या एका आयोजित कार्यक्रमात सोफिया सहभागी झाली होती. हुबेहुब मानवासारखी दिसणारी सोफियाने यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट सर करणार असल्याचे सोफियाने यावेळी सांगितले. परंतु, ते कधी सर करणार याविषयी तिनं अद्याप सांगितलं नाही.
सौदी अरबचे नागरिकत्व मिळालेली सोफिया ही पहिली रोबो आहे. हाँगकाँगच्या हॅनसन रोबॉटिक्स या कंपनीनं सोफियाला बनवलं आहे. मानवाचे गुण असलेली सोफिया ही पहिली रोबो आहे.
[Source: Maharashtra Times | March 23, 2018]
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी