Search This Blog

Thursday, 29 March 2018

संजीवनी जाधवला सुवर्ण

भारतीय धावपटूंनी भूतानची राजधानी थिम्पू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना तीन सुवर्णपदकांसह एक रौप्यपदकाची कमाई केली. फॉर्मात असणाऱ्या महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव आणि प्रदीप चौधरी यांनी वैयक्तिक, तर पुरुष संघाने सांघिक सुवर्णपदक मिळविले. पुरुष विभागात मानने वैयक्तिक रौप्यपदक मिळविले. महिला संघाला सांघिक प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

महिलांच्या आठ किलोमीटर शर्यतीत संजीवनीने सुवर्णपदक जिंकले असले, तरी अन्य सहकाऱ्यांच्या अपयशामुळे महिला संघास सांघिक रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या दहा किलोमीटर शर्यतीत भारताचा प्रदीप चौधरी सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. प्रदीपला अन्य सहकाऱ्यांची सुरेख साथ मिळाली. त्यामुळे पुरुष विभागात भारताला सांघिक सुवर्णपदकाची कमाई करता आली.

[Source: Sakal | March 29, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी