Search This Blog

Thursday, 29 March 2018

देशात 1 कोटी रोजगारनिर्मिती होणार

केंद्र सरकार 1 कोटी नवीन रोजगारनिर्मिती करणार आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना 12 टक्केप्रमाणे तीन वर्षांच्या भविष्यनिर्वाह निधीची तरतूदही सरकारकडून करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेअंतर्गत रोजगारनिर्मितीसाठी नव्याने पावले उचलली जात असून, याचा सर्वाधिक फायदा युवावर्गाला होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर प्रथमत: संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.


अशी आहे प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना ऑगस्ट 2016 मध्ये सुरू झाली होती. याअंतर्गत संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत कंपनीचे योगदान सरकार करीत आहे. हे योगदान कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन + महागाई भत्ता 8.33% असे असते.
 होणारे फायदे
  • असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही सामाजिक सुरक्षेअंतर्गत भविष्यनिर्वाह निधी व निवृत्तिवेतन आदी सुविधांचा लाभ मिळेल.
  • मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगाराचा लाभ होणार
  • आतापर्यंत 500 कोटी रुपये खर्च
  • आतापर्यंत देशभरातील 31 लाख बेरोजगारांना फायदा  [Source: Sakal | March 30, 2018]
 

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी