Search This Blog

Sunday, 25 March 2018

राज्यसभा निवडणुक 2018

लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेतही भाजप हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. शुक्रवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने 12 जागा जिंकल्याने आता त्यांचे राज्यसभेतील संख्याबळ 69 झाले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत एकत्र आलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला धक्का देत भाजपने उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 9 जागा जिंकल्या. क्रॉस व्होटिंगच्या आरोपाने रंगलेल्या या निवडणुकीत समाजवादी पक्षाला आपली जागा राखण्यात यश आले. मात्र, बसपला आपली जागा गमवावी लागली.

राज्यसभेच्या 58 जागांपैकी 10 राज्यांतील 32 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित 26 जागांसाठी आज 7 राज्यांत निवडणूक झाली.
उत्तर प्रदेश : एकूण १० जागांसाठी निवडणूक
भाजपा :  ९  [अरुण जेटली सह इतर ]
समाजवादी पक्ष : १ [जया बच्चन ]
दहाव्या जागेसाठी चुरशीने झालेल्या लढतीत मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला मोठा धक्का बसला. भाजपच्या अनिल अग्रवाल यांनी बसपच्या बी. आर. आंबेडकर यांचा पराभव केला. उत्तर प्रदेशमध्ये सपने नितीन अग्रवाल आणि बसपने अनिल सिंह यांचे मत अवैध ठरविण्याची मागणी केली होती. या दोन आमदारांनी आपली मतपत्रिका पक्षाच्या पोलिंग एजंटला दाखवली नसल्याचा आरोप या पक्षांनी केला होता. त्यामुळे काही काळ मतमोजणी थांबविण्यात आली होती.

कर्नाटक : एकूण ४ जागांसाठी निवडणूक
कॉंग्रेस : ३    [सैद नासीर हुसैन, एल. हनुमंतैया आणि जी. सी. चंद्रशेखर]
भाजपा : १ , [राजीव चंद्रशेखर ]

प. बंगाल : एकूण ५ जागांसाठी निवडणूक
तृणमूल कॉंग्रेस : ४
कॉंग्रेस : १  [अभिषेक मनू संघवी ]

तेलंगणा : कूण ३ जागांसाठी निवडणूक
तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस): ३ [बी. प्रकाश, जे. संतोष कुमार आणि ए. बी. लिंगैया यादव ]
कॉंग्रेसचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री पी. बलराम नाईक यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

छत्तीसगड : १ जागे साठी निवडणूक
भाजपा : १ [सरोज पांडे ]

केरळ :  १ जागे साठी निवडणूक
डाव्या लोकशाही आघाडी : १
[वीरेंद्र कुमार]

झारखंड : एकूण २ जागांसाठी निवडणूक
भाजपा : १
[समीर उरांव ]
कॉंग्रेस : १  [धीरज साहू ]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी