Search This Blog

Thursday, 22 March 2018

राजा रविवर्मांच्या 'तिलोत्तमे'चा ५.१७ कोटींस लिलाव

प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले तिलोत्तमा या पौराणिक कथेतील अप्सरेचे चित्र येथील लिलावात 5.17 कोटी रुपयांना विकले गेले आहे.
येथे मॉडर्न अँड कॉंटेम्पररी साउथ एशियन आर्ट या प्रदर्शनात हा लिलाव करण्यात आला. या चित्राला 3.90 कोटी रुपये अपेक्षित असताना त्याहून अधिक किंमत मिळाली. राजा रविवर्मा यांची फार निवडक चित्रे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाली असून, त्यातील तिलोत्तमेचे हे चित्र आहे.
राष्ट्रीय खजिना म्हणून भारत सरकारने जाहीर केलेल्या रविवर्मा यांनी रामायण, महाभारत आणि इतर पौराणिक कथांमधील व्यक्तिमत्त्वे रंगविली आहेत.

तिलोत्तमा पेंटिंग : 
 
पौराणिक कथेनुसार, सुंद आणि उपसुंद या दोन दैत्यबंधूंना मारण्यासाठी ब्रह्मदेवाच्या विनंतीनुसार तिलोत्तमा ही अप्सरा स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. तिला मिळविण्याच्या इर्ष्येने दोन्ही भावांनी एकमेकांशी लढाई केली आणि त्यात त्यांचा अंत झाला.

राजा रवी वर्मा :

हे भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार होते त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. राज रविर्वमाने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावॆत, ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्म्यानॆ काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात.

रवींचा जन्म एका राजघराण्यात २९ एप्रिल १८४८ रोजी केरळमधील कोईल तंपुरन येतील किलिमनूर राजवाड्यात झाला. तयांचे वडील मोठे विद्वान व आई ही कवयित्री होती. त्यांच्या आईने लिहिलेले काव्य, 'पार्वती स्वयंवर' हे रविवर्म्याने तिच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध केले. त्यांना  सी.गोडा वर्मा नावाचा भाऊ व मंगला नावाची बहीण होती.त्यांच्या बालपणीच त्याला महाराज अलियम् तिरुनल या त्याच्या नातलग राजाचा आश्रय मिळाला. रविवर्म्याचे काका उत्तम चित्रकार होते. तो वारसा पुतण्यात उतरला. याशिवाय त्रिवेंद्रमच्या राजदरबारी असणारे इंग्रज चित्रकार थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्रावणकोर महाराजांच्य प्रोत्साहनामुळे त्याला अधिकच प्रेरणा मिळाली.

१८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत रविवर्मा यांनी सुवर्णपदक मिळवले. महाराजांच्या दरबारात असणाऱ्या इटालियन तैलचित्रांकडे पाहून त्यांनी  तैलचित्रे काढण्याचे ठरवले.

सन इ.स. १८७३ मध्ये, व्हिएन्ना येथे झलेल्या कला प्रदर्शनात त्यांना मिळालेल्या प्रथम पारितोषिकामुळे ते जागतिक क्षेत्रावर प्रकाशझोतात आले .[Source: Sakal, The Hindu, Wikipedia / March 23, 2018 ]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी