Search This Blog

Thursday, 22 March 2018

पेरूचे राष्ट्रपती कुजेन्स्कींचा राजीनामा

पेरुचे राष्ट्रपती पेड्रो पाबलो कुजेन्स्की यांनी आपल्या राष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. राष्ट्राला संबोधित करत त्यांनी आपल्या भाषणादरम्यान आपल्या पदाचा राजीनामा दिला. ''मी आपल्या पदाचा राजीनामा देत असून, माझा हा निर्णय देशाच्या हितासाठीच आहे, असे कुजेन्स्की यांनी सांगितले.

कुजेन्स्की यांनी या निर्णयाची घोषणा पेरू काँग्रेसमध्ये महाभियोग चालू होण्यापूर्वी केली आहे. 79 वर्षीय कुजेन्स्की यांच्यावर ब्राझिलच्या बांधकाम व्यावसायिक विशाल ओडेब्रेक्ट यांच्यासोबत संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला. या आरोपतूनच त्यांनी राजीनामा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राजीनामा देताना त्यांनी आपला हा निर्णय राष्ट्राच्या हिताचा असल्याचे सांगितले.

दरम्यान, कुजेन्स्की यांच्या राजीनाम्यामुळे पेरुचे उपराष्ट्रपती मार्टिन विजकारा हे या पदाचा कार्यभार स्वीकारतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मार्टिन विजकारा हे सध्या कॅनाडासाठी पेरूचे राजदूत आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका टाळण्यासाठीच मार्टिन यांची निवड राष्ट्रपतिपदावर करण्यात येणार आहे.
[Source: Sakal | March 23, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी