
मारूतीची 6 टक्के निर्यात वाढ
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मारूतीने ह्युंदाई, फोक्सवॅगन आणि जनरल मोटर्स या कंपन्यांना स्पर्धेत मागे टाकत बाजी मारली आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2017 या काळात मारूती सुझुकीने 57,300 कार्सची निर्यात केली आहे. मागील वर्षी याच काळात मारूतीने 54,008 कार्सची निर्यात केली होती. मारूतीच्या निर्यातीत मागच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 6 टक्के वाढ झालेली आहे.
ह्यूंदाई मोटर्स चौथ्या क्रमांकावर
आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत मारूतीने चांगलीच आघाडी घेतली आहे. कार निर्यातीत ह्यूंदाई मोटर्स गेली काही वर्षे सातत्याने आघाडीवर होती. परंतु, चालू आर्थिक वर्षात ह्यूंदाईने 44,585 कार्सची निर्यात केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तूलनेत ही जवळपास 29.25 टक्क्यांची घसरण आहे. त्यामुळेच ह्यूंदाई मोटर्सची पिछेहाट होत ती फोक्सवॅगन आणि जनरल मोटर्स नंतर चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.
[Source: Sakal | March 30, 2018]
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी