Search This Blog

Thursday, 22 March 2018

हुतात्मा जवानांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च सरकार करणार

केंद्र सरकारने हुतात्मा जवानांच्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. देशासाठी लढणारे जवान अनेकदा आपल्या प्राणांची आहुती देतात. या जवानांच्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हुतात्मा, जखमी आणि बेपत्ता जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

भारतीय लष्करातील जवान देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देत असतात. त्यांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबीयांसाठी सरकारकडून काही आर्थिक मदतही केली जाते. तसेच यापूर्वी हुतात्मा, जखमी आणि बेपत्ता जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च म्हणून दरमहा 10 हजार रुपये देण्याची मर्यादा होती. मात्र, आता ही मर्यादा रद्द करण्याचे आदेशच संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. याबरोबरच लष्करातील हुतात्मा जवानांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी विशिष्ट मर्यादा होती. अर्थ मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना काढली असून ही 10 हजार रुपयांची मर्यादा हटवली आहे.
अर्थात, सरकारी किंवा सरकारी सहाय्य असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असल्यासच ही शैक्षणिक सवलत मिळेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यामध्ये केंद्र व राज्य सरकारांनी संपूर्णपणे आर्थिक भार उचललेल्या शैक्षणिक संस्था, लष्करी शाळा व महाविद्यालये आदींचा यात समावेश आहे.
[Source: Sakal, Loksatta | March 23, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी