Search This Blog

Friday, 23 March 2018

मालदीवमधील आणीबाणी अखेर उठवली

मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशात 45 दिवसांपासून लागू असलेली आणीबाणी उठवली. देशातील स्थिती आता पूर्वपदावर आल्याने आणीबाणी उठवत असल्याचे यामीन यांच्या कार्यालयाने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

सुरक्षा दलाचा सल्ला आणि देशातील स्थिती सामान्य करण्याच्या प्रयत्नाचाच भाग म्हणून अध्यक्षांनी आणीबाणी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या राजकीय कैद्यांची सुटका करण्याचा निकाल दिल्यानंतर मालदीवमध्ये राजकीय संकट निर्माण झाले. मात्र, आदेश पाळण्यास नकार देत अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सुरवातीला 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान पंधरा दिवसांची आणीबाणी लागू केली होती.
[Source: Sakal | March 24, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी