चार दिवसांच्या दौऱ्यासाठी ती मायदेशात ‘मिट मलाला’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येथे आली आहे. ऑक्टोबर २०१२मध्ये १५ वर्षांची मलाला पाकिस्तानातील महिला आणि लहान मुलींच्या शिक्षणांदर्भात काम करीत असल्याने तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर हल्ला चढवला होता. यामध्ये तिच्या डोक्याला गोळी चाटून गेली होती. त्यानंतर पाकिस्तानातील पेशावरच्या मिलिटरी रुग्णालयात तीला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तिला लंडनमध्ये चांगल्या उपचारांसाठी पाठवण्यात आले. मलाला सारख्या शाळकरी मुलीवर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा त्यावेळी जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता.
मुस्लिम महिलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलालाला २०१४ मध्ये शांततेच्या नोबेलने सन्मानित करण्यात आले होते. [Source: Loksatta, Sakal | Match 30, 2018]
मुस्लिम महिलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलालाला २०१४ मध्ये शांततेच्या नोबेलने सन्मानित करण्यात आले होते. [Source: Loksatta, Sakal | Match 30, 2018]
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी