Search This Blog

Thursday, 29 March 2018

Karnataka Assembly Election : द्रविड आणि फेसबुक बजावणार महत्त्वाची भूमिका

कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि फेसबुक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहेत. कारण द्रविड कर्नाटक विधनासभा निवडणुकांसाठी ब्रॅंड अॅम्बेसेडर असणार आहे. तर निवडणूक आयोगाचा सोशल मीडिया पार्टनर म्हणून फेसबुक कायम राहणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी स्पष्ट केलं आहे.

कर्नाटकमध्ये 12 मे रोजी मतदान होणार असून 15 मे रोजी मतमोजणी होणार आहे. येथे 224 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही आयोगाने केली आहे. कर्नाटकात सध्या 122 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे. या निवडणुकीचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर उमटणार आहेत. [Source: Loksatta | March 30, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी