कबड्डीला आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रवेश करून अनेक वर्षे लोटली असली तरी ऑलिम्पिक प्रवेशाचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यासाठी
वर्ल्ड कबड्डीच्या माध्यमातून पाच खंडातील जवळपास ५० देशांचे प्रतिनिधी बेंगळुरूत एकत्र आले आणि त्यांनी येत्या १० वर्षांत म्हणजेच २०२८पर्यंत कबड्डीच्या ऑलिम्पिक प्रवेशाचा मार्ग निश्चित केला. त्याशिवाय, वर्ल्ड कबड्डीची घटना आणि नियमावलीही तयार करण्यात येणार आहे. आशियाई कबड्डीची मुहूर्तमेढ रोवणारे नेते
शरद पवार यांनीही याचे स्वागत केले असून कबड्डीच्या या वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत. या बैठकीनंतर
के. पी. राव हे वर्ल्ड कबड्डीचे अध्यक्ष
तर मलेशियाचे एस.टी. आरासू हे सचिव आणि कोस्टा रिकाचे प्रभाकर शरण हे खजिनदार म्हणून निवडून आले. नव्या कबड्डी फेडरेशनच्या ध्वजाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातून अनेक अर्जुनवीर कबड्डीपटू या बैठकीला उपस्थित होते.
[Source: Maharashtra Times | March 28, 2018]
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी