
२०६६ किलो वजनाच्या या उपग्रहाच्या बांधणीसाठी २७० कोटी रुपये खर्च आला आहे. या उपग्रहाचे आयुर्मान १० वर्षआहे. GSAT-6A उपग्रह GSAT-6 या उपग्रहासारखाच असल्याचे इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे.
» GSAT-6A या दळणवळण उपग्रहाकडे सर्वात मोठी अँटिना असून इस्त्रोने या अँटिनाची निर्मिती केली आहे.
» उपग्रह अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर ६ मीटर व्यासाचा हा अँटिना छत्रीसारखा उघडेल.
» GSAT-6A हा उपग्रह तीन वर्षांपूर्वी अवकाशात पाठवण्यात आलेल्या GSAT-6 या उपग्रहाला मदत करणार आहे.
» GSAT-6A मुळे सॅटलाइट आधारित मोबाइल कॉलिंग आणि कम्युनिकेशन सेवा अधिक प्रभावी होईल.
» GSAT-6A मुळे दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होईल.
» GSAT-6A च्या प्रक्षेपणासाठी जीएसएलव्हीमध्ये क्रायोजेनिक इंजिनासह विकास इंजिनचाही वापर करण्यात आला. भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेत विकास इंजिनचा वापर होऊ शकतो.
[Source: Loksatta, Sakal, | March 30, 2018]
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी