संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भविषयनिर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या 'एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन' (ईपीएफओ) या संघटनेने नुकतेच पेन्शनर पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर पेन्शनसंबंधी सर्व प्रकारची माहिती प्राप्त होणार आहे. त्यामध्ये पेन्शनविषयीचे आदेश, पेन्शन पेमेंट विवरण, पासबुक, पेन्शन जमा होण्याची तारीख, पेन्शनचे प्रमाणपत्र आदी माहिती प्राप्त करणे शक्य होणार आहे. त्यामुळे निवृत्तांवर सातत्याने 'ईपीएफओ' कार्यालयाच्या खेपा घालण्याची वेळ येणार नाही.
संबंधितांनी 'ईपीएफओ'च्या www.epfindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन 'ई-केवायसी पोर्टल'चा पर्याय निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर 'ट्रॅक ई-केवायसी'चा पर्याय निवडल्यास तेथे सर्व प्रकारचे तपशील उपलब्ध होतील. या सुविधेच्या माध्यमातून 'ईपीएफओ'चे सदस्य आपल्या 'यूएएन' आणि आधार क्रमांकाशी जोडून संबंधित विवरण ऑनलाइन पाहू शकणार आहेत.[Source: Maha Times | March 29, 2018]

0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी