Search This Blog

Thursday, 29 March 2018

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचे ३२५ सदस्यांचे पथक

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे पथक नेमके किती सदस्यांचे असणार याचे उत्तर अखेर सोमवारी मिळाले. साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू या प्रमुख खेळाडूंच्या पालकांसह क्रीडा मंत्रालयाने भारताच्या ३२५ सदस्यांच्या पथकाला मंजुरी दिली.

भारतीय ऑलिंपिक संघटनेने सादर केलेल्या यादीतील सदस्यांना क्रीडा मंत्रालयाच्या पदाधिकाऱ्यांनी वगळल्यानंतर ‘आयओए’ अध्यक्षांनी क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यांच्या हस्तक्षेपानंतर क्रीडा मंत्रालयाने यादीला आज अंतिम स्वरूप दिले. यात साईनाचे वडील हरवीरसिंग आणि सिंधूची आई विजया यांना सरकारच्या खर्चाशिवाय जाण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर पालक याच कारणाने वगळण्यात आलेले नेमबाज हीना सिद्धूचे पती रोनक पंडित यांना प्रशिक्षक म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली.

क्रीडा मंत्रालयाने आज ३२५ सदस्यांचे पथक मंजूर केले. यातील २२ अतिरिक्त पदाधिकारी सरकारच्या खर्चाशिवाय जाणार आहेत.

वैद्यकीय पथक दोघांचेच
सरकारने भारतीय पथकाबरोबर असणाऱ्या वैद्यकीय पथकातील सदस्यांची संख्या चारवरून दोन केली आहे. यातून वैद्यकीय तज्ज्ञ मेंडिरत्ता आणि महिला फिजिओ हेमा वालेचा यांना वगळण्यात आले आहे. सचिन जैन हे डॉक्‍टर आणि अमित सोनी हे पुरुष फिजिओ असे दोघेच आता पथकातील अधिकृत वैद्यकिय अधिकारी असतील. [Source: Sakal | March 29, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी