Search This Blog

Monday, 26 March 2018

‘डेटा’ साक्षरतेत भारतीय कर्मचारी आघाडीवर

ऑस्ट्रेलिया, सिंगापूरमधील कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक आश्वासकतेबाबतचे ‘क्लिक’चे सर्वेक्षण

डिजिटल प्रेरित आधुनिक अर्थव्यवस्था म्हणून भारताचा विकास साधण्यात डेटा साक्षरतेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचा निष्कर्ष डेटा विश्लेषणातील क्लिक या आघाडीच्या कंपनीने केलेल्या आशिया—पॅसिफिक डेटा साक्षरता सर्वेक्षणातून अधोरेखित झाला आहे. व्यवसायाचे अधिक धोरणात्मक आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी संबंधित डेटाचा लाभ भारतीय व्यावसायिक कसा घेत आहेत याचे विवेचन या संशोधनात्मक सर्वेक्षणात करण्यात आले आहे.

सर्वात जास्त डेटा साक्षरांसह भारत (४५% विरुद्ध क्षेत्रीय सरासरी २०%) आघाडीवर असून जपानमध्ये केवळ ६% कर्मचारी स्वत:ला डेटा साक्षर मानतात. भारत ६४%, ऑस्ट्रेलिया ३९% आणि सिंगापूर ३१% मधील सी-सूट आणि संचालक आपल्या डेटा साक्षरतेच्या पातळीबाबत अधिक आत्मविश्वास बाळगत असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. वय वषे ५५ हून अधिक असलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास या बाबतीत भारतातील ३२% आणि ऑस्ट्रेलियातील २०% कर्मचारी या क्षेत्रातील इतर देशांपेक्षा अधिक डेटा साक्षर आहेत. भारतातील ८८%), चीनमधील ७६% आणि सिंगापूरयेथील ७५% कर्मचाऱ्यांना त्यांचे नियोक्ते डेटा मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी साहाय्य करतात.
[Source: Loksatta | March 27, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी