Search This Blog

Thursday, 22 March 2018

ब्राह्मोस या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

ब्राह्मोस या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राची राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.तीन महिन्यांपूर्वी सुखोई एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेण्यात आली होती.

ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयी :

भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या जून २००१ मध्ये या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियातील मस्कवा नदी यांच्यावरुन याचे नाव ब्रह्मोस असे ठेवण्यात आले. या क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या गतीपेक्षा तीनपट अधिक आहे. २९० किमी पर्यंत मारा करु शकण्याची तर ३०० किग्रॅ वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची याची क्षमता आहे.

१२ फेब्रुवारी १९९८ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईलमॅन दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि रशियाचे पहिले डेप्युटी डिफेन्स मिनिस्टर एन. वी. मिखाईलॉव यांनी एका करारावर हस्ताक्षर केल्यानंतर ब्रह्मोसच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला होता. भारताच्या डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओएम या संस्थांकडून हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे.

[Source: Sakal, Loksatta | March 23, 2018]0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी