Search This Blog

Wednesday, 21 March 2018

भारतातल्या भिकाऱ्यांची यादी लोकसभेत जाहीर

नुकतीच भारतातल्या भिकाऱ्यांची यादी सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोत यांनी लोकसभेत जाहीर केली. या माहितीनुसार संपूर्ण देशात ४ लाख १३ हजार ७६० भिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी २०११ मधली आहे. अर्थात ती गेल्या काही वर्षांत वाढण्याचीही शक्यता आहे.
लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री थावर चंद यांनी ही यादी जाहिर केली. यानुसार मिझोराम राज्यात सर्वात कमी भिकाऱ्यांची संख्या आहे. मिझोरामध्ये ५३ भिकारी आहेत. तर लक्षद्विप, दादरा नगर हवेली, दिव दमण या केंद्रशासित प्रदेशात अनुक्रमे २, १९ आणि २२ भिकारी आहेत. सर्वाधिक भिकारी असणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगाल अव्वलस्थानी असून उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. पश्चिम बंगालमध्ये ८१ हजार २४४ भिकारी आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उत्तर प्रदेशात ६५ हजार ८३५ भिकारी आहेत.

सर्वाधिक भिकारी असलेली राज्य
 • पश्चिम बंगाल – ८१, २४४ 
 • उत्तर प्रदेशात – ६५, ८३५ 
 • बिहार- २९,७२३ 
 • आंध्र प्रदेश- ३०, २१८ 
 • मध्य प्रदेश- २८, ६९५ 
 • आसाम- २२, ११६ 
 • राजस्थान – २५, ८५३ 
 • महाराष्ट्र- २४,३०७

कमी भिकारी असलेली राज्य आणि केंद्रशासित प्रदेश
 • गोवा- २४७ 
 • पुद्दुचेरी- ९९ 
 • अंदमान निकोबार बेटे- ५६ 
 • मिझोराम – ५३ 
 • सिक्किम – ६८
[Source: Loksatta / March 22, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी