दक्षिण आफ्रिके-विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात झालेल्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तर, चेंडू कुरतडण्याची प्रत्यक्ष कृती करणारा कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट याला नऊ महिने निलंबित करण्यात आले आहे.
या तिघांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी दोषी ठरवले होते. त्यावेळीच त्यांच्यावरील अंतिम कारवाई २४ तासांत जाहीर केली जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. प्रशिक्षक डॅरेन लिमन यांना मात्र क्लिन चीट देण्यात आली आहे. यष्टिरक्षक टीम पेनी याची कसोटी कर्णधार म्हणूनदेखील निवड करण्यात आली.

आयपीएलही नाही
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दोषी खेळाडूंवर एक वर्षाची बंदी घातल्यावर ‘बीसीसीआय’ने आपली भूमिका स्पष्ट करीत स्मिथ, वॉर्नर यांना या मोसमासाठी ‘आयपीएल’चे दरवाजे बंद केले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दोषी खेळाडूंवर एक वर्षाची बंदी घातल्यावर ‘बीसीसीआय’ने आपली भूमिका स्पष्ट करीत स्मिथ, वॉर्नर यांना या मोसमासाठी ‘आयपीएल’चे दरवाजे बंद केले.
यापूर्वीच्या बंदी...
आजपर्यंतच्या क्रिकेटमधील बंदीच्या महत्त्वाच्या घटनांचा हा ओझरता आढावा...
[Source: Sakal | March 29, 2018] आजपर्यंतच्या क्रिकेटमधील बंदीच्या महत्त्वाच्या घटनांचा हा ओझरता आढावा...
- वर्णभेदाच्या लढाईत दक्षिण आफ्रिकेवर १९७० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची २० वर्षांची बंदी
- क्रिकेटमधील पहिल्या मॅच फिक्सिंग प्रकरणात (२०००) हन्सी क्रोनिए, महंमद अझरुद्दीन, अजय शर्मा, अता उर रेहमान, सलिम मलिक यांच्यावर आयुष्यभराची बंदी
- उत्तजेक सेवन प्रकरणात २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नवर एक वर्षाची बंदी
- शोएब अख्तर, महंमद असिफ यांच्यावर उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यावर अख्तरवर दोन, तर असिफवर एका वर्षाची बंदी. असिफ २००७ मध्ये याच प्रकरणी दोषी आढळल्यावर आणखी एका वर्षाची बंदी
- उत्तेजक चाचणी संदर्भात ठावठिकाणा (व्हेअर अबाउट्स) सांगण्यास नकार दिल्याने वेस्ट इंडीजच्या आंद्रे रसेलवर २०१७ मध्ये एका वर्षाची बंदी
- बांगलादेशाच्या शकिब अल हसनवर २०१४च्या मोसमात असभ्य वर्तन केल्याप्रकरणी दोन वेळा कारवाई. पहिल्या कारवाईत तीन सामन्यांसाठी निलंबन, तर दुसऱ्या कारवाईनंतर सहा महिन्यांची बंदी
- वर्णभेदविरोधी टिप्पणी केल्याने झिंबाब्वेच्या मार्क व्हर्म्युलेनवर २००६ मध्ये झिंबाब्वेकडून आयुष्यभराची बंदी
- पाकिस्तानच्या रझा हसनवर २०१५ मध्ये उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे दोन वर्षांची बंदी
- स्पॉट फिक्सिंग प्रकरणात २०११ मध्ये पाकिस्तानच्या महंमद अमीर (५ वर्षे), सलमान बट (१० वर्षे), महंमद असिफ (७ वर्षे) कठोर कारवाई
- पाकिस्तानच्या दानिश कानेरियावर कौंटी क्रिकेटमधील मॅच फिक्सिंग प्रकरणात २०१० मध्ये आयुष्यभराची बंदी
- आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात भारताच्या श्रीशांतवर आयुष्यभराची बंदी
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी