पुण्याच्या अर्जुन कढे याने आयटीएफ फ्युचर्स-४ टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीत एन. विजय सुंदर प्रशांतच्या साथीत विजेतेपद मिळवले. अर्जुन कढेचे हे विजय सुंदरच्या साथीतील सलग तिसरे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने कोलकाता आणि चंडीगड येथील स्पर्धेत एन. विजय सुंदरच्या साथीत बाजी मारली होती. त्याचबरोबर त्याने एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने त्याला दुहेरी मुकुट मिळवण्याची संधी आहे.
तिरुअनंतपूरम येथे ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील दुहेरीत २४ वर्षीय अर्जुनने ३१ वर्षीय एन. विजय सुंदर प्रशांतच्या साथीने विजेतेपद मिळवले. अर्जुन - विजय सुंदर जोडीने अंतिम फेरीत ब्राझीलच्या सिओ सिल्वा- थलेस टरुणी जोडीवर ६-७ (५), ६-४ (१०-७) असा विजय मिळवला
[Source: Maharashtra Time | March 24, 2018]

0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी