Search This Blog

Wednesday, 28 March 2018

मिरज पूर्वभागात प्राचीन जैन संस्कृतीचे अवशेष

जैन धर्मातील प्राचीन संस्कृतीचे अनेक पुरावे मिरज पूर्व भागात यापूर्वी निदर्शनास आले आहेत. या अनुषंगाने या भागातील डोंगर परिसरात उत्खनन व संशोधन होण्याची गरज आहे. भोसे, दंडोबा, कोंगनोळी, मल्लिकार्जुन डोंगर या भागात गेल्या काही वर्षांत तसे थोडेफार प्रयत्न झाले असता तशी झलक दिसून आली आहे.

कवठेमहांकाळ तालुक्‍यातली कोंगनोळी येथे १९६५-६६ च्या सुमारास भगवान पार्श्‍वनाथांची मूर्ती आढळली होती. त्या मूर्तीचे सर्वांच्या सहभागाने मंदिर झाले आहे. याशिवाय तेथे अन्य काही मूर्तीही आढळल्या होत्या. एकूणच मिरज पूर्व भागातील भोसे, कळंबी, आरग, बेडग, लिंगनूर, मालगाव हा सारा परिसर प्राचीन जैन संस्कृतीचा परिसर आहे. त्यादृष्टीने या भागात संशोधन व उत्खनन गरजेचे आहे.’’
[Source: Sakal | March 29, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी