भारताची १८ वर्षीय नेमबाज
एलावेनिल वालारिवनने गुरुवारी
आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमाची नोंद करून सुवर्णपदकाची कमाई केली. गुरुवार एलावेनिलसाठी संस्मरणीय ठरला; कारण याच गटातील सांघिक स्पर्धेत तिने श्रेया अग्रवाल आणि झीना खितासह सुवर्णपदकाची कमाई करून दाखवली. याच दरम्यान
अर्जुन बाबुताने ज्युनियर वर्ल्ड कपमधील आपले दुसरे पदक या स्पर्धेतून मिळवले. त्याने मुलांच्या
१० मीटर एअर रायफलमध्ये ब्राँझची कमाई केली.
एलावेनिलची ही कारकिर्दीतील दुसरी वर्ल्ड कप स्पर्धा होती, तर या स्पर्धेतील फायनलमध्ये सहभागी घेण्याची मात्र तिची ही पहिलीच वेळ होती. तिने मुलींच्या १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत २४९.८ गुणांची कमाई करून सुवर्णपदकावर नाव कोरले. प्राथमिक फेरीत तिने केलेली
६३१.४ गुणांची कमाई ही विक्रमी ठरली.
गेल्याच आठवड्यात पार पडलेल्या एफआयएसयू जागतिक नेमबाजी क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत एलोवेनिलने ब्राँझपदकाची कमाई केली होती.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी