
नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडिया आणि त्याच्या दोन सहाय्यक कंपन्यांमधील समभाग खरेदी करण्यात रस दाखवणाऱ्या खासगी कंपन्यांना आपले अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एअर इंडियामधील ७६ टक्के हिस्सा विकल्यानंतर या कंपनीचे सर्व अधिकार संबंधीत खासगी कंपनीकडे जातील.
एअर इंडियाच्या घटनेच्या नियमांनुसार, ही कंपनी केवळ भारतीय नागरिकच खरेदी करु शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी कर्जामध्ये बुडलेल्या एअर इंडियामधील गुंतवणूक काढून घेण्याबाबत संमती दर्शवली होती. दरम्यान, एअर इंडिया या ब्रॅण्डला काही वर्षांपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, एअर इंडियाचे कर्मचारी सरकारी गुंतवणूक काढून घेण्याला आणि या कंपनीला इतर खासगी कंपनीला विकण्याच्या सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला आहे. त्यांना यामुळे आपल्या नोकरीवर गदा येण्याची भिती वाटत आहे. मात्र, आता मोदी सरकारने यातील मोठी हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतल्याने एअर इंडिया कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी हो मोठा झटका मानला जात आहे.
[Source: Loksatta | March 30, 2018]
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी