
विदर्भ गोल्फ असोसिएशनतर्फे आयोजित महिप सिंग गोल्फ चषक स्पर्धेमध्ये प्रतिभावंत गोल्फपटू अरिन अहुजा 'चॅम्पियन' ठरला. अरिनने बेस्ट ग्रॉस प्रकारात सर्वोत्तम कामगिरीसह ८० गुणसंख्या करीत बाजी मारली. या प्रकारात गार्ड रेजिमेंटल कामठीचे कर्नल सवित खन्ना ८१ गुणांसह उपविजेते ठरले. याशिवाय गेस्ट नेट प्रकारात अनुज सिंगने ६८ गुणांसह विजेतेपद पटकाविले तर कर्नल प्रदीप वर्मा यांना ७० गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. प्रौढांच्या गटामध्ये कर्नल मृगेंद्रसिंग यांनी बाजी मारीत बेस्ट ग्रॉस चषक पटकाविले तर मोहन मेहता दुसऱ्या स्थानावर राहिले.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी