Search This Blog

Wednesday, 14 March 2018

नवजोत कौर दुसऱ्या क्रमांकावरआशियाई विजेतेपद पटकाविणारी कुस्तीगीर नवजोत कौर हिला ६५ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले आहे. जागतिक कुस्ती महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत नवजोतने ही झेप घेतली आहे. किरगिझस्तान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्ण जिंकले होते आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. या क्रमवारीत प्रथमच एवढे वरचे स्थान नवजोतला मिळाले आहे. पहिल्या क्रमांकावर फिनलंडची पेत्रा ओली आहे. विनेश फोगट ही ५० किलो वजनी गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ५९ किलो गटात संगीता फोगट पाचव्या क्रमांकावर आहे. ६२ किलोत ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक चौथ्या स्थानावर आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी