Search This Blog

Monday, 19 March 2018

इंडिया बीपीओ प्रमोशन स्कीम

केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत नव्या बीपीओ कंपन्यांना प्रोत्साहनासाठी सुरू केलेल्या "इंडिया बीपीओ प्रमोशन स्कीम'सुरू केली आहे. 
यामुळे शहराजवळच्या गावांतील तरुणांना तिथेच काम मिळाल्याने मोठ्या शहरात जाऊन नोकरी मिळवण्याचा त्यांचा त्रास कमी करण्याचा उद्देश आहे. आयटी कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात विकास असणाऱ्या पुणे, मुंबई या शहरांना वगळून भिवंडी, वर्धा, नाशिक, सांगली, औरंगाबाद, धुळे, नागपूर या शहरांसाठीच ही योजना लागू केली आहे. केंद्र सरकारने या स्कीमअंतर्गत बीपीओ कंपनी सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर संबंधितांना नऊ महिन्यांच्या आत कंपनी सुरू करावी लागते.   

दृष्टिक्षेपात योजना :

- योजनेसाठी केंद्राची 493 कोटी रुपयांची तरतूद
- 2011 च्या जनगणनेनुसार देशभरात 48, 300 जागा निश्‍चित
- महाराष्ट्रात 3,900 जागा
- राज्यातील भिवंडी, वर्धा, नाशिक, सांगली, औरंगाबाद, धुळे, नागपूर या शहरांची निवड


0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी