Search This Blog

Wednesday, 14 March 2018

‘गोदावरी गौरव’ पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्रातील लोकसेवा, साहस, चित्र, ज्ञान, चित्रपट, संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा "गोदावरी गौरव' पुरस्कार देऊन त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला.

  • · डॉ. रवींद्र व स्मीता कोल्हे (लोकसेवा),
  • · डॉ. स्नेहलता देशमुख (ज्ञान),
  • · सुभाष अवचट (चित्र, शिल्प),
  • · पं. सत्यशील देशपांडे (संगीत),
  • · अमोल पालेकर (चित्रपट, नाट्य),
  • · सुदर्शन शिंदे, महेश साबळे (साहस)

एकवीस हजार रूपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

रावसाहेब थोरात सभागृहात कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गोदावरी गौरव पुरस्कारांचे वितरण झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी