
ज्येष्ठ कवी, लेखक आणि विचारवंत डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे आज वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज सायंकाळी घरात लेखन करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
15 एप्रिल 1944 रोजी डॉ. बोल्ला यांचा सोलापुरात जन्म झाला. त्यांचे वडील सहकार आणि राजकारणात होते. परंतु डॉ. बोल्ली यांना तेलगू- मराठी साहित्याचा लळा लागला. त्यांनी अनेक कथा, कविता, आत्मचरित्रांचा अनुवाद केला. मैफल, झुंबर, सावली हे त्यांचे काव्यसंग्रह. ‘तेलगू फुलांचा मराठी सुगंध’ या त्यांच्या तौलनिक अभ्यासाला गुरुमहात्म्य पुरस्कार मिळाला.
‘एका साळियाने’ या आत्मचरित्राला राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार मिळाला. ‘कविराय राम जोशी’ या कादंबरीला अत्यंत प्रतिष्ठेच्या दमाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या साहित्याची दखल घेऊन हैदराबादच्या पोट्टी श्रीरामुलू विश्व विद्यालयाने मानद डी.लिट् दिली होती.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी