Search This Blog

Wednesday, 14 March 2018

अभिनेत्री श्रीदेवीचे निधनअभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 55 वर्षांच्या होत्या
 
तामिळनाडुतील सिवाकासी येथे 13 ऑगस्ट 1963 रोजी श्रीदेवी हिचा जन्म झाला होता. वयाच्या चैथ्या वर्षीच तिने थुनाईवन या चित्रपटाद्वारे अभिनयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर अनेक वर्ष तेलगु, तामिळ, मल्याळम व कन्नड चित्रपटात तिने बाल कलाकार म्हणुन काम केले. तर बॉलीवुडमध्येही 1975 मध्ये आलेल्या ज्युली चित्रपटात तिला बाल कलाकार म्हणुन काम करण्याची संधी मिळाली. 1976 मध्ये आलेल्या मोंदुरु मूडुचु या तामिळ चित्रपटात वयाच्या 13 व्या वर्षी मुख्य नायिकेचे पात्र साकारता आले.
सोलावा सावन (1978) साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात श्रीदेवी यांनी नायिकेची भूमिका साकारत मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. श्रीदेवी यांनी सदमा सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात साकारलेली भूमिका चाहत्यांच्या मनात कायम आहे.
 
निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर 2012 साली आलेल्या इंग्लिश-विंग्लिश या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना 2013 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
 
काही महत्वाचे चित्रपट
ऽ    ज्युली,
ऽ    सोलावा सावन,
ऽ    सदमा, हिम्मतवाला,
ऽ    जाग उठा इन्सान,
ऽ    अकलमंद,
ऽ    इन्कलाब,
ऽ    तोहफा,
ऽ    सरफरोश,
ऽ    बलिदान,
ऽ    नया कदम,
ऽ    नगीना,
ऽ    घर संसार,
ऽ    मक्सद,
ऽ    सुलतान,
ऽ    आग और
ऽ    शोला, 
ऽ    आखरी रास्ता,
ऽ    जाबाज,
ऽ    वतन के रखवाले,
ऽ    जवाब हम देंगे,
ऽ    औलाद,
ऽ    नजराणा,
ऽ    भगवान,
ऽ    कर्मा,
ऽ    हिम्मत और मेहनत,
ऽ    मिस्टर इंडिया,
ऽ    निगाहे,
ऽ    जोशिली,
ऽ    गैर कानुनी,
ऽ    चालबाज,
ऽ    खुदा गवाह,
ऽ    लम्हे,
ऽ    हिर रांझा,
ऽ    चांदणी,
ऽ    रूप कि राणी चोरो का राजा,
ऽ    चंद्रमुखी,
ऽ    चांद का टूकडा,
ऽ    गुमराह,
ऽ    लाडला,
ऽ    आर्मी,
ऽ    जुदाई,
ऽ    हल्ला बोल,
ऽ    इंग्लिश
ऽ    विंग्लिश,
ऽ    मॉम

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी