Search This Blog

Friday, 16 March 2018

मॅजिकल मेस्सी

लिओनेल मेस्सीने बहारदार दोन गोल करतानाच अन्य एका गोलात मोलाची भूमिका बजावली; त्यामुळे बार्सिलोनाने चॅंपियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील चेल्सीविरुद्धच्या लढतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात ३-० असा विजय मिळविला. बार्सिलोनाने ही लढत ४-१ अशी सहज जिंकत आगेकूच केली.

चॅंपियन्स
लीगमधील मेस्सीचे गोलांचे शतक
मेस्सीने २.०८ मिनिटांतच गोल केला. हा त्याचा कारकिर्दीतील सर्वात वेगवान गोल.
चॅंपियन्स लीगमध्ये इंग्लिश क्‍लबविरुद्ध दहा लढतीत गोल करू शकला नव्हता; पण त्यानंतर सलग १८ लढतीत गोल.

बायर्नचा बहर कायम
इस्तंबूल - बायर्न म्युनिकने तुर्कीच्या बेसिक्तासविरुद्ध दुसऱ्या टप्प्यात ३-१ बाजी मारत विजयाची औपचारिकता ८-१ अशी पूर्ण केली. बायर्नचे मार्गदर्शक जुपप हेनिक्‍स यांचा या स्पर्धेत हा सलग ११वा विजय. ते २०१३ च्या विजेतेपदानंतर निवृत्त झाले होते; पण या मोसमात त्यांनी पुनरागमन केले.

बहारदार बार्सिलोना
सलग अकराव्यांदा चॅंपियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत
इंग्लिश क्‍लबविरुद्ध बार्सिलोनाचा हा
२३ वा विजय, अन्य क्‍लबपेक्षा सर्वाधिक
चेल्सीविरुद्धच्या पहिल्या दोनही शॉटवर गोल
प्रतिस्पर्ध्यातली ही १४ वी लढत, चॅंपियन्स लीग इतिहासातील ही दोन क्‍लबमध्ये झालेल्या सामन्यातील सर्वाधिक तिसरी लढत. बायर्न-रेयाल माद्रिद (१८) आघाडीवर
चॅंपियन्स लीग लढतीत घरच्या मैदानावर
बार्सिलोनाचा हा २६ विजय (४० लढतीत)

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी