Search This Blog

Wednesday, 14 March 2018

ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांचं निधन

एकपात्री रंगभूमीवरील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांचं सोमवारी रात्री डोंबिवली इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. चांदेकर यांच्या मागे मुलगा व सून असा परिवार आहे. चांदेकर यांचं पार्थिव पुण्यातील राहत्या घरी नेण्यात आलं असून वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

चांदेकर हे एकटेच पुण्यात राहत असत. काही दिवसांपूर्वी ते डोंबिवली इथं मुलाकडं राहायला गेले होते. तिथंच काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. उपचादरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

सदानंद चांदेकर म्हणजे रसिकांना खळखळून हसवणारे एकपात्री रंगभूमीवरील विनोदाचे खणखणीत नाणे होते. 'हसरी उठाठेव' या विनोदी नाट्यातून त्यांनी रसिकांचे दीर्घकाळ मनोरंजन केले होते. त्यांचे एकपात्री कार्यक्रम रसिकांना विशेष भावत. 'आम्ही दिवटे' हे त्यांचं आत्मकथन प्रसिद्ध आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी