Search This Blog

Wednesday, 14 March 2018

मधु मंगेश कर्णिक यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारराज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त देण्यात येणारे ४ सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. यंदाचा श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो या दिवशी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत

मधु मंगेश कर्णिक :

ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते व राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालक आहेत. याशिवाय कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट यांचे संस्थापकही आहेत. त्यांनी ‘करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळ’ स्थापन केले आणि त्या मंडळाचे करूळ ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलही सुरू केले.
मधु मंगेश कर्णिक यांनी करूळचा मुलगा या शीर्षकनावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
कोकणी गं वस्ती’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे. मधु मंगेश कर्णिक यांची पहिली कथा - कृष्णाची राधा - ही रत्ना्कर मासिकातून प्रसिद्ध झाली. तेव्हा ते मॅट्रिकच्या वर्गात होते. त्यांच्या कोल्हापुरातील वास्तव्यात खर्या अर्थाने कर्णिकांच्या लेखनाची सुरुवात झाली. त्यांच्या लोकसत्तेत लिहिलेल्या कथांना प्रसिद्धी आणि मानधनही मिळाले. त्यानंतर धनुर्धारी,  विविध वृत्त यां साप्ताहिकांमधूनही त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या.
त्यांनी पतितपावन व निर्माल्य या चित्रपटांसाठी संवाद व गीते लिहिली, आकाशवाणीसाठी अनेक नभोनाट्ये व श्रुतिका लिहिल्याय आलमगीर, गोमंतक, पुढारी, साधना, तरुण-भारत (सांज), मनोहर या नियतकालिकांतून स्तंभलेखनही केले.
इ.स.1950 ते 1965 या काळात मधु मंगेश कर्णिकांनी खूप कथा लिहिल्या. सत्यकथेत कथा प्रसिद्ध झाल्यापासून तर त्यांच्या अंगी एवढे बळ संचारले की, ते दर दिवाळीला पंधरावीस तरी कथा लिहू लागले.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी