Search This Blog

Wednesday, 14 March 2018

सौर आघाडीसाठी भारताच्या पुढाकाराचे स्वागतसौरऊर्जेचा वापर जगभरात वाढण्यासाठी भारताच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे (आयएसए) अमेरिकेने स्वागत केले आहे. सर्व देशांना परवडणारे सौरऊर्जा तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, यासाठी 'आयएसए'च्या माध्यमातून १२१ देशांसाठी दहा कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतच्या करारांवर भारत, फ्रान्ससह २३ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

सौरऊर्जा उपलब्ध असणाऱ्या देशांमध्ये त्याचा वापर वाढावा, इंधनावरील खर्च कमी व्हावा या उद्देशाने स्थापन झालेल्य 'आयएसए'मुळे जागतिक हवामानबदलाच्या समस्येला तोंड देता येणे शक्य होणार आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. 'सौरआघाडीच्या स्थापनेसाठी भारत सरकारने घेतलेला पुढाकार आणि त्यासाठी केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत. या महत्त्वाच्या विषयासंबंधी होत असलेल्या प्रयत्नांमुळे येणाऱ्या काळात सौरऊर्जेचा वापर आणखी वाढेल असा विश्वास आहे,' असे अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या प्रवक्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 'आयएसएने ठेवलेली उद्दिष्ट्ये, स्वस्तात तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी आखलेला कार्यक्रम, सामाजिक स्तरावर वाढणारा वापर, आर्थिक आघाडीवर येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी केलेले उपाय आदींमुळे विकसनशील देशांची निश्चितच प्रगती होणार आहे,' असे अमेरिकेने म्हटले आहे. सौरऊर्जेचा वापर कृषी, सौर जलपंप, स्वयंपाक आदींसाठी होऊ शकतो. सौरऊर्जा क्षेत्रात नव्या संकल्पना राबविण्यास वाव आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आयएसए' परिषदेत स्पष्ट केले होते. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान याबाबत महत्त्वाची चर्चा झाली. 

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी