
डॉ. सिंधुताई सपकाळ यांचा जीवनपट
अनाथांची आई म्हणून व्रत स्वीकारलेल्या ज्येष्ठ समाज सेविका
सिंधुताई सपकाळ यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत आपलं आयुष्य व्यतीत करून शेकडो
अनाथांना आईची माया दिली. त्यांच्या या संघर्षाची दखल घेत त्यांना यापूर्वी अनेक
पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. सिंधुताई सपकाळ उपाख्य माई म्हणूनच त्या
सर्व परिचित आहेत. सिंधुताईंचा जन्म हा वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथील आहे.
उर्मिला आपटे यांचा जीवनपट
उर्मिला बळवंत आपटे या मुंबई येथील ‘भारतीय स्त्री शक्ती’ स्वयंसेवी
संस्थेच्या अध्यक्षा आहेत. यांना त्यांच्या संस्थेच्यावतीने महिलांच्या सर्वांगिन
विकासासाठी केलेल्या कामाच्या योगदानबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारतीय स्त्री शक्ती ही स्वयंसेवी संस्था महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, मानसिक आणि शारिरिक आरोग्य, स्वाभीमान, आर्थिक
स्वातंत्र्य तसेच लिंग समानता या पंचसुत्रीवर मोहिम, सर्वेक्षण, संशोधन, कार्यशाळा, प्रशिक्षणांच्या
माध्यमातून समुपदेशनाचे कार्य करते.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी