Search This Blog

Wednesday, 14 March 2018

विदेशी शस्त्रे आयात करण्यात भारत 'अव्वल'देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रांसाठी भारत अद्याप दुसऱ्या देशावर अवलंबून आहे. परदेशी शस्त्रे आणि संरक्षणासाठी लागणारे उपकरणे आयात करणारा भारत पहिला देश बनला आहे. २०१३ ते २०१७ या दरम्यान जगभरातून आयात केल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांपैकी १२ टक्के शस्त्रे ही एकट्या भारतानं आयात केली आहेत. स्वदेशी शस्त्रे बनविण्यात भारताला म्हणावं तसं यश न आल्यानं भारताला अद्याप दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागतंय.

'इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर्स'ने नुकताच एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार, भारताकडून शस्त्रे आयात करण्याच्या टक्केवारीत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २००८ ते २०१३ च्या तुलनेत भारतानं २०१३ ते २०१७ पर्यंत २४ टक्के अधिक शस्त्रे आयात केली आहेत. जागतिक यादीत भारतासोबतच सऊदी अरब, मिस्र, यूएई, चीन, ऑस्ट्रेलिया, अल्जेरिया, इराक, पाकिस्तान आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे. २०१३ ते २०१७ या दरम्यान भारतानं ६२ टक्के शस्त्रे ही रशियाकडून आयात केली आहेत. १५ टक्के शस्त्रे अमेरिकेकडून तर ११ टक्के शस्त्रे इस्रायलकडून आयात केली आहेत.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी