Search This Blog

Monday, 19 March 2018

रशियात व्लादिमीर पुतीन पुन्हा एकदा विजयी

रशियामध्ये रविवारी अध्यक्ष निवडीसाठी मतदान पार पडले. यांत रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. पुतिन यांच्याशिवाय अन्य सात उमेदवार या निवडणुकीत सहभागी होते. परंतु गेली दोन दशके रशियातील राजकारण व जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या पुतिन यांनी तब्बल ७३.९ टक्के मतांच्या फरकाने आपल्या विरोधकांवर एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे आता आणखी सहा वर्षांचा कार्यकाल त्यांना मिळणार आहे. पुतिन यांची कार्यशैली पाहता त्यांना हुकुमशाह असे म्हटले जाते. आणि म्हणूनच मतदानादरम्यान मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला होता, असे दावे रशियातील राजकीय तज्ज्ञांनी केले होते. परंतु पुतिन यांनी पुन्हा एकदा निर्विवाद विजय मिळवून आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.
जवळपास 20 वर्षे रशियात सत्तेवर असलेल्या व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा एकदा निवडणूक जिंकत देशाच्या राजकारणावरील आपली पकड आणखी घट्ट केली आहे. अधिकृतरित्या जाहीर झालेल्या निकालांनुसार, पुतीन यांना 76 टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळाली आहेत.
1999 पासून पुतीन यांनी रशियाचे पंतप्रधानपद आणि नंतर अध्यक्षपद सांभाळले आहे. यापूर्वी 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुतीन यांना 64 टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत पॅव्हेल ग्रुडिनिन यांना 12 टक्के मते मिळाली. सेनिया सोबाचक आणि व्लादिमीर झिरिनोव्हस्की यांना अनुक्रमे दोन टक्के आणि सहा टक्के मते मिळाली. पुतीन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अलेक्‍सी नवल्नी यांचा अर्ज कायदेशीर कारणाने बाद झाला होता.
निवडणुकीपूर्वी एका सर्वेक्षणात बहुसंख्य नागरिकांनी पुतीन यांना पहिली पसंती दिली होती. 'सामर्थ्यशाली रशियाचा सामर्थ्यशाली अध्यक्ष' अशी पुतीन यांच्या प्रचाराची 'थीम' होती.

पुतिन यांच्या विशेष आवडी

  • पुतिन ज्युडोचे 5 th dan ब्लॅकबेल्ट आहेत, तर कराटेचे 8 th dan ब्लॅकबेल्ट आहेत. याबरोबरच ते तायक्वांदोचेही 9th Dan ब्लॅकबेल्ट असून ही तायक्वांदोमधील सर्वात वरची रँक आहे
  • पुतिन यांना पाळीव कुत्र्यांची विशेष आवड आहे. आपल्या कुत्र्याचे नामकरण करण्यासाठी त्यांनी रशियामधील नागरिकांची स्पर्धा घेतली. त्यातून निवडण्यात आलेले बफी हे नाव त्यांनी आपल्या बल्गेरियन शेफर्ड कुत्र्याला दिले. त्यांच्याकडे असणाऱ्या पाळीव प्राण्यांपैकी अनेक प्राणी त्यांना भेट म्हणून मिळाले आहेत.
  • रशियन भाषेशिवाय पुतिन यांना जर्मन भाषा येते. ही भाषा ते अतिशय चांगल्या पद्धतीने बोलूही शकतात. जर्मनीच्या पंतप्रधान अँजेला मार्केल रशियाला आल्या असताना त्यांनी इंटरप्रीटर म्हणून कामही पाहिले. ते इंग्रजीचा वापर फारच कम करतात.0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी