Search This Blog

Wednesday, 14 March 2018

जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडेयंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे सोपविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला ‘प्लॅस्टिकच्या प्रदूषणाचा पराभव‘ ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची मुख्य थीम असेल.
पर्यावरण मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि यूएनईपीचे प्रमुख एरिक सोलहेम यांनी संयुक्तरित्या यजमानपदाची घोषणा केली.
प्लॅस्टिकच्या भस्मासुराशी लढण्याचे आव्हान पेलण्यासाठी यूएनईपीने जगभरातील देश, उद्योगविश्व आणि नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. प्लॅस्टिकने होणारे प्रदूषण रोखायचे असेल, तर अपारंपरिक उर्जास्रोतांचा वापर वाढविणे आणि प्लॅस्टिकचे उत्पादन तातडीने कमी करण्याबरोबरच, प्लॅस्टिकच्या पुनर्वापरावर भर देण्याचे गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
 
पाश्र्वभूमी
1972 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या परिषदेमध्ये विश्व पर्यावरण दिवस सुरु करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, त्यानंतर दोन वर्षांनी 5 जून 1974 पासून 5 जून हा दिवस साजरा करण्यास सुरवात झाली.

1 comments:

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी