भारतीय फुटबॉल संघाने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल शंभर संघात स्थान मिळवले आहे. भारत आता लिबियासह संयुक्त ९९ व्या क्रमांकावर आहे. गतवर्षी जुलैमध्ये भारताने ९६ वे स्थान मिळवले होते, पण वर्षअखेरपर्यंत भारताची १०५ क्रमांकापर्यंत घसरण झाली होती. भारताने यापूर्वीच्या क्रमवारीच्या तुलनेत तीन क्रमांकांनी प्रगती केली आहे. भारताचे यापूर्वी ३३३ मानांकन गुण होते ते आता ३३९ झाले आहेत. आशियाई क्रमवारीत भारताने १३ वा क्रमांक मिळवला आहे. भारताने कतार, ओमान, जॉर्डन, बहारीन, उत्तर कोरियास मागे टाकले आहे. आशियात इराण (जागतिक क्रमवारी ३३) अव्वल आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया (३७) आणि जपान (५५) आहे.
Friday, 16 March 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी