Search This Blog

Sunday, 18 March 2018

जलपातळीत चिंताजनक घटराज्यातील १२६ तालुक्‍यांतील सात हजार २५६ गावांतील भूजल पातळी एक मीटरहून अधिक घसरल्याने या गावांत यंदा भीषण पाणीसमस्या उद्भवू शकते, असा धक्कादायक अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाने (जीएसडीए) वर्तविला आहे. २०१७ मध्ये मॉन्सून सरासरीपेक्षा २० टक्‍क्‍यांहूनही अधिकतर कमी झाल्याने भूजलात ही तूट आली.

भूजल सर्वेक्षण विभागाकडून वर्षातून चार वेळा भूगर्भातील जलपातळी तपासली जाते. पाणलोट क्षेत्रातील तीन हजार ९२० निरीक्षणे करत विहिरींमधील पाण्याची पातळी मोजली गेली. जानेवारी २०१८ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पाणीपातळी खालावल्याचे वास्तव निदर्शनास आले. अनेक ठिकाणी विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्यात. याचा परिणाम राज्यात एप्रिल ते जूनदरम्यान भीषण पाणीसमस्या डोके वर काढणार, असा अंदाज जीएसडीएने वर्तविला. राज्यातील एक हजार ३७६ गावे अधिकतर दुष्काळाच्या प्रभावात असणार आहेत.
(Source: Sakal / 18 March 2018)

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी