Search This Blog

Wednesday, 14 March 2018

मागास बिहारला शिक्षणाचा ध्यासप्रत्येक एक किलोमीटरवर शाळा; उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड

पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मात्र याउलट स्थिती बिहारमधील असून तेथे एक किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळा आहे. माध्यमिक शाळा तीन कि.मी.वर तर उच्च माध्यमिक शाळा प्रत्येक पाच किलोमीटरवर उभारण्यात आली आहे.


राज्यात शैक्षणिक क्षेत्र सक्षम करण्यासाठी बिहारमधील संयुक्त जनता दल व भाजप आघाडीच्या सरकारने शाळांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून तो अंमलातही आणला आहे. बिहार विधानसभेत याबाबतची माहिती शिक्षण मंत्र्याचा तात्पुरता कार्यभार सांभाळणारे श्रावण कुमार यांनी शुक्रवारी (ता.9) दिली. ""प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी उच्च माध्यमिक शाळा उभारण्याच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे, असे सांगून कुमार म्हणाले एकूण आठ हजार 391 ग्रामपंचायतींपैकी पाच हजार 59 ग्रामपंचायतींमध्ये माध्यमिक शाळा आहेत, तर दोन हजार 200 ग्रामपंचायतींमध्ये उच्च माध्यमिक शाळा आहेत.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी