Search This Blog

Wednesday, 14 March 2018

सौरमालेजवळ पंधरा नवीन बाह्यग्रह सापडल्याची घोषणाटोकियो इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची घोषणा

टोकियो इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने सौरमालेजवळ पंधरा नवीन बाह्यग्रह सापडल्याची घोषणा केली असून, त्यातील एका ग्रहावर पृथ्वीप्रमाणेच द्रवरूपात पाणी असण्याची शक्यता आहे.

तांबडय़ा लहान बटू ताऱ्यांभोवती हे ग्रह फिरत असून या संशोधनामुळे ग्रहांच्या निर्मिती प्रक्रियेवर नवा प्रकाश पडणार आहे. लालबटू ताऱ्यांपैकी के २-१५५ हा तारा पृथ्वीपासून दोनशे प्रकाशवर्षे दूर आहे. त्याच्या भोवती महापृथ्वीसारखे तीन ग्रह फिरत असून ते पृथ्वीपेक्षा मोठे आहेत. ताऱ्याभोवती सर्वात बाहेरच्या कक्षेत असलेल्या ग्रहाचे नाव के २-१५५डी असे ठेवण्यात आले आहे. तो गोल्डीलॉक झोन म्हणजे वसाहतयोग्य पट्टय़ात आहे. तेरुयुकी हिरानो यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले असून, नासाच्या केप्लर दुर्बिणीने दुसऱ्या मोहिमेत मिळवलेल्या माहितीच्या आधारे हे पंधरा ग्रह शोधण्यात आले आहेत. या संशोधकांनी स्पेनमधील नॉर्डिक ऑप्टिकल टेलिस्कोप व हवाई येथील सुबारू टेलिस्कोप यांच्या मदतीने पृथ्वीवरून निरीक्षणे केली.

हिरानो यांनी सांगितले, की यातील एक ग्रह वसाहतयोग्य टप्प्यात असून त्रिमिती जागतिक हवामान सादृश्यीकरणाच्या आधारे तेथे द्रवरूपात पाणी असण्याची शक्यता आहे. पण तसे असेलच अशी खात्री देता येत नाही.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी