Search This Blog

Friday, 16 March 2018

युरिया अनुदानासाठी २०२० पर्यंत मुदतवाढशेतकऱ्यांना मिळणाऱ्या युरियाअनुदानासाठीच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भविष्यात शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसे युरिया उपलब्ध व्हावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्राकडून शेतकऱ्यांना ५,३६० रुपये प्रतिटन या कमाल किरकोळ दराने युरियाचा पुरवठा करण्यात येतो. उत्पादन खर्च आणि या दरातील फरकाची रक्कम उत्पादकांना अनुदान स्वरूपात सरकारकडून भरपाई देण्यात येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थमंत्रालयाच्या समितीद्वारे याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 'युरियासाठीची अनुदान योजना कायम राहिली तर याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे २०२० पर्यंत अनुदानाची मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे' असे या समितीने सांगितले.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी