माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची (आयटी) शिखर संघटना असलेल्या ‘नॅसकॉम’च्या अध्यक्षपदी ‘इंटेल कॉर्पोरेशन’च्या दक्षिण आशिया विभागाच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका असलेल्या देवयानी घोष यांची निवड झाली आहे.
येत्या एप्रिलमध्ये घोष ‘नॅसकॉम’ची सूत्रे स्वीकारतील. ‘नॅसकॉम’च्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. घोष यांनी तब्बल २० वर्षे ‘इंटेल कॉर्पोरेशन’मध्ये विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. जागतिक बाजारापेठेतील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी ‘नॅसकॉम’ची भूमिका त्यांच्या कार्यकाळात निर्णायक ठरणार आहे.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी