Search This Blog

Wednesday, 14 March 2018

जागतिक विद्यापीठांमध्ये "एमआयटी' अव्वल

"क्वॅकक्वॅरेली सायमंड' या संस्थेने 2018मधील जागतिक पातळीवरील उत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) सलग सहाव्या वर्षी बाजी मारली आहे.
जगातील 950 उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये "एमआयटी' यंदाही प्रथम क्रमांकावर झळकत आहे. विशेष म्हणजे या यादीतील पहिली चारही विद्यापीठे अमेरिकेतील आहेत. दुसरा क्रमांक स्टॅनफर्ड विद्यापीठाने पटकाविला असून, तिसऱ्या चौथ्या जागेवर अनुक्रमे हारवर्ड विद्यापीठ कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्था आहेत. ब्रिटनमधील विद्यापीठांची घसरण सुरूच असल्याचे या वर्षीही दिसून येते. 76 ब्रिटिश विद्यापीठांपैकी 51 विद्यापीठे एका क्रमांकाने उतरली आहेत. यात केवळ कॅब्रिज विद्यापीठाचा समावेश पहिल्या पाचामध्ये असून, त्याचा क्रमांक पाच आहे.
भारतातील नऊ विद्यापीठांना या यादीत स्थान मिळाले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी दिल्लीतील तंत्रशिक्षण संस्थेला 172 वे स्थान मिळाले आहे. आयआयटी मुंबई 179, आयआयएस्सी बंगळूर 190, तर आयआयटी मद्रासचे 264 वा क्रमांक आहे. दिल्ली विद्यापीठ 481-490 या स्थानावर आहे.

विद्यापीठांची क्रमवारी
1)
मॅसॅच्युसेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
2)
स्टॅनफर्ड विद्यापीठ
3)
हारवर्ड विद्यापीठ
4)
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
5)
कॅब्रिज विद्यापीठ
6)
ऑक्सफर्ड विद्यापीठ
7)
युनिर्व्हसिटी कॉलेज लंडन
8)
इन्पेरियल कॉलेज लंडन
9)
शिकागो विद्यापीठ
10)
ईटीएच झुरिच- स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

भारतातील उत्कृष्ट विद्यापीठे
172)
आयआयटी दिल्ली
179)
आयआटी मुंबई
190)
आयआयएस्सी बंगळूर
264)
आयआयटी मद्रास
293)
आयआयटी कानपूर
308)
आयआयटी खरगपूर
431-440)
आयआयटी रुडकी
481-490)
दिल्ली विद्यापीठ
5010-550)
आयआयटी गुवाहाटी
 

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी