
जगातील सर्वात मोठ्या लांबीची ही गुहेला 'क्रेम पुरी' असे नाव देण्यात आले आहे. ही गुहा 2016 साली शोधण्यात आली असून, या गुहेची लांबी 'मेघालय अॅडव्हेंचर असोसिएशन'ने (एमएए) मोजमाप केल्यानंतर समोर आली. या गुहेची लांबी 5 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीमध्ये मोजण्यात आली. ही गुहा जमीनखालील 6000 मीटरपेक्षा मोठी असून, याने जागतिक विक्रम केला आहे. यापूर्वी वेनेझुएलातील एडू झुलिया येथील 'क्युवा डेल समन' ही गुहा सर्वात मोठ्या लांबीची गुहा म्हणून प्रसिद्ध होती. या गुहेची लांबी 18,200 मीटर इतकी आहे. मात्र, आता या गुहेचा विक्रम मोडीत निघाला आहे.
'क्रेम पुरी'नंतर सामान्य प्रणालीत क्रेम लिएट प्राह-उमिम-लबित प्रणालीतील भारताची दुसरी सर्वात मोठी गुहा ठरली आहे. मेघालयातील 31 किमी लांबीचे मोजमाप केल्यानंतर ही सर्वात लांब असल्याचे स्पष्ट झाले आहे.
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी